ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का!


 

स्थैर्य, कोलकाता, दि.२३: पश्चिम
बंगालमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला तृणमूलचे तब्बल
चार मंत्री गैरहाजर राहिले. यात राजीव बॅनर्जी, गौतम देव, रविंद्रनाथ घोष
आणि चंद्रनाथ सिन्हा यांचा समावेश आहे. नुकतेच शुभेन्दु अधिकारी यांच्यासह
टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे मंत्रिमंडळाच्या
बैठकीत या नेत्यांच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

यासंदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे
महासचिव पार्थ चटर्जी म्हणाले, की या मंत्र्यांनी नक्कीच मुख्यमंत्री ममता
बॅनर्जी यांना आपण बैठकीला का उपस्थित राहू शकलो नाही, यासंदर्भात माहिती
दिली असेल. मात्र, इतर नेत्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात कसल्याही प्रकारची
चर्चा नाही. पण, राजीव बॅनर्जी यांच्या न येण्याने, ते भाजपच्या वाटेवर
असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून
बंडाच्या मार्गावर चालत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी टीएमसीच्या हाय
कमांडलाही निशाण्यावर घेतले होते. यानंतर पार्थ चटर्जी आणि प्रशांत किशोर
यांनीही राजीव बॅनर्जी यांच्यासोबत बैठक केली होती. पक्षातील सूत्रांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही राजीव बॅनर्जी भाजपच्या मार्गावर जाण्याची
शक्यता आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!