ब्रिटनमधील व्हायरस भारतात आढळला नाही; पुण्यातील AIDS रिसर्च इंस्टीट्यूटची माहिती


 

स्थैर्य, पुणे, दि.२३: नॅशनल AIDS रिसर्च इंस्टीट्यूट
(NARI) न सांगितले की, ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन कोरोना व्हायरस भारतातील
चाचण्यांमध्ये आढळला नाही. NARI इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ची
एक ब्रँच आहे.

NARI चे
डायरेक्टर डॉ. समिरन पांडा यांनी मंगळवारी सांगितले की, आम्ही देशातील
विविध ठिकाणांवरुन गोळा केलेल्या सँपलचे परीक्षण केले आहे. यात कोरोनाचा
ब्रिटनमधील नवीन स्ट्रेन आढळला नाही. त्यांनी पुढे सांगितले की, या नवीन
व्हायरसचे संक्रमण आणि गंभीरता समजण्याची आवश्यकता आहे. अजून या व्हायरसचा
मानवी शरीरावरील परिणामही कळू शकला नाही.

भारतातील व्हायरसमध्येही बदल नाही

डॉ.
पांडा पुढे म्हणाले की, आम्ही देशात पसरत असलेल्या व्हायरल जीनोमवर 6-7
महिन्यांपासून लक्ष्य ठेवत आहोत. यासाठी 2000 पेक्षा जास्त सँपलचे परीक्षण
केले, पण यात कोणतेही बदल आढळले नाही. भारतात व्हायरसचा संसर्ग एकसारखा
नाही. प्रत्येक राज्यात हा व्हायरस वेगवेगळ्या प्रकारे फिरत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!