गोळीबार मैदान, जाधववाडी परिसरात पोलिसांची गस्त


दैनिक स्थैर्य । 10 जून 2025। फलटण ।गोळीबार मैदान, जाधव वाडी रोड परिसरात मोटर सायकल वरून येऊन अनोळखी आरोपींनी महिलांचे गळ्यातील गंठण चोरीचे घटना घडल्याने, फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच वाहन चालविण्याच्या नियमांचा भंग केल्याने अनेक अपघात झाले आहेत. अशा अपघातात काही वेळा मनुष्यहानी सुद्धा झाली आहे.

यासाठी सोमवार दि. 9 रोजी या परिसरात पोलिसांनी पायी गस्त केली. यावेळी मोटर सायकल तपासणी मोहीम घेण्यात आली. यावेळी वाहन चालकांनी मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याबाबत एकूण केसेस 50 दाखल करून त्यांच्याकडून 43 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला.

मोटार सायकलची चोरी करणारे गुन्हेगार हे नंबर नसलेल्या मोटर सायकलचा वापर करीत आहेत. शहरात अनेक मोटर सायकलना नंबर प्लेट लावलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे.

तरी सर्व वाहन मालकांनी आपापल्या मोटर सायकलना त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक दिसेल असा लावावा. मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करावे. मोटर वाहन कायद्याचा भंग करणार्‍या वाहन चालकाविरुद्ध यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!