शिवजयंती: उद्या सकाळी ११ वाजता छ. शिवाजी महाराज चौकात रणजितदादांच्या उपस्थितीत अभिवादन


उद्या १९ एप्रिल रोजी शिवजयंतीनिमित्त फलटण येथील छ. शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १८ एप्रिल : उद्या, रविवार दि. १९ एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ठीक ११:०० वाजता हा सार्वजनिक अभिवादन सोहळा पार पडणार आहे.

या मान्यवरांची असणार प्रमुख उपस्थिती:

या अभिवादन सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक आणि नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

  • माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • आमदार सचिन पाटील

  • फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

  • उपनगराध्यक्ष आणि सर्व विद्यमान नगरसेवक

  • फलटण पंचायत समितीचे सभापती व पंचायत समिती सदस्य

  • फलटण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य

रणजितसिंह भोसले यांचे जाहीर आवाहन:

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि या अभिवादन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व मित्र पक्षांचे सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी उद्या सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती ‘महाराजा मल्टीस्टेट’चे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!