हनुमंतराव हायस्कूलमध्ये 20 वर्षांनंतर जमला माजी विद्यार्थ्यांचा मेळा


दैनिक स्थैर्य । 10 जून 2025। फलटण । येथील सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 20 वर्षांनंतर जुन्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात 2005- 06 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन आयोजित केले होते.

या स्नेहसंमेलनास श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या सचिव अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, संचालिका सौ. स्वाती फुले, मुख्याध्यापक नागेश पाठक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.

माजी विद्यार्थ्यांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक यांचा झाडांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.

शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं मंदिर नाही, तर ती आयुष्यभराची शिदोरी आणि आठवणींचा खजिना असतो. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र आले. मध्यंतरी फलटणमध्ये महाबळेश्वरपेक्षाही अधिक म्हणजेच विक्रमी 362.5 मिमी पावसाची नोंद झाली. तरीही हवामानाची तमा न बाळगता देशविदेशातून माजी विद्यार्थ्यांची हजेरी लावली.

या सोहळ्यासाठी अमेरिका, दुबई, कतार, पुणे, मुंबई, सांगली, अहमदनगर आदी ठिकाणांहून माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले.

या स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देणारा भावस्पर्शी फोटोंचा व्हिडिओ दाखविण्यात आला. शिक्षकांच्या आठवणी, संवाद, कविता, गाणी, खेळ व सांस्कृतिक सादरीकरणप्रेम व आपुलकीने भरलेले क्षण सगळ्यांच्या मनात कायमचे कोरले गेले. स्नेह, सन्मान, आणि स्मृतींच्या धाग्यांनी विणलेला हा सोहळा सहभागी प्रत्येकाच्या मनात आयुष्यभरासाठी घर करून गेला.

यावेळी चहा-नाश्ता आणि जेवणाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे स्नेहाचा आस्वाद अधिक गडद झाला. शाळेला एक कायम आठवण म्हणून मंच (पोडियम) भेट देण्यात आला.

या स्नेहसंमेलनासाठी प्रताप कदम, शरद पवार, वर्षा खवळे, रूपाली शेंडे, राधा भाग्यवंत, अनिल चोरमले, प्रविण ढवळे, सचिन वाळा यांनी विशेष मेहनत घेतली.


Back to top button
Don`t copy text!