मांढरदेव गडावर चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या महीलांवर कारवाईवाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई


 

स्थैर्य, सातारा, दि.१४: चोरीच्या मांढरदेव गड परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या महिलांवर वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने कारवाई केली आहे. माधूरी लक्ष्मण डुकळे वय -25, रा. वाघेश्‍वरमंदिर वाघोली पुणे, रेश्मा अनिल जाधव वय -40, रा. वाघेश्‍वरमंदिर वाघोली पुणे, पुजा धनाजी पवार वय 25 रा. पाटीलवस्ती , केसनंद, वाघोली, पुणे, कमलाबाई मोहन जाधव वय – 50, रा. पाटीलवस्ती, केसनंद, वाघोली पुणे, सुरेखा रमेश पवार वय 40 रा. पाटीलवस्ती, केसनंद, वाघोली पुणे, दिपाली हिरामण सुकळे वय 25 रा. पाटीलवस्ती, केसनंद, वाघोली, पुणे अशी त्यांची  नावे आहेत. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मंदिरे उघडलेली आहेत. त्यामुळे वाई पोलीस ठाणे अंतर्गत येणारे मांढरदेव गडावर अमावस्या पोर्णिमेला मांढरदेवीच्या दर्शनाकरीता मोठया प्रमाणावर भाविकांची वर्दळ राहते. भाविकांच्या वर्दळीचा फायदा घेवून काही महीला व पुरुष मोबाईल, पर्स चोरी करतात. अशा प्रकारच्या चोर्‍या करणारे महीला व पुरुष यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबतच्या सुचना पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला दिलेल्या होत्या. दि. 13 रोजी अमावस्याच्या अगोदरचा रविवार हा देवीचा वार असल्याने मोठया प्रमाणावर दर्शना करीता भाविकांची वर्दळ राहणार होती. त्यावेळी पाकिटमारीचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे पोनि आनंदराव खोबरे पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी व महीला कर्मचारी यांनी साध्या वेशात मांढरदेव गडावर भाविकांच्या गर्दीत गस्त करुन व वॉच ठेवून चोरी करण्याच्या हेतून मांढरदवे गडावर भाविकांच्या गर्दीत फिरणार्‍या 6 महीलांना ताब्यात घेवून त्याच्यावर सी.आर.सी.सी .10 9 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे मांढरदेव गडावर घडणार्‍या पाकिटमारीच्या गुन्हांना आळा बसला असून मांढरदेव ट्रस्ट व ग्रामस्थांनी पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी वाई तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आनंदराव खोबरे यांच्या सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, म.पो.कॉ.ज्ञानेयवरी भोसले, सुप्रिया सापते यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!