• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

गुगल पेद्वारे अपहारप्रकरणी एकास अटक वाई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई 

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 14, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.१४: महागडा मोबाईल विकत घेताना एकाची 65 हजारांची फसवणूक झाली आहे. गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारणार्‍या संशयिताने पैसे मिळताच फोन स्वीच ऑफ केला. संशयीताचा फोन बंद असूनही वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत संशयीतास पुणे येथून अटक केली. किरण गणपती गायकवाड वय 35 रा. उत्तरेश्‍वरनगर, लोहगाव पुणे मुळ रा. अक्कलकोट रोड सोलापूर असे संशयिताचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, दिनांक 24 नोहेंबरला अज्ञात आरोपीताने फोन नंबर 7058859120 वरुन आय फोन 12 प्रो 128 जीबीचा मोबाईल खरेदीचा व्यवहार फिर्यादी इम्रान शफी सय्यद यांच्याशी ठरवला होता. फिर्यादीस आरोपीने गुगल पे व्दारे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने त्याच्या भावाच्या बँक ऑफ इंडियाच्या अकाऊन्ट नंबरवरून गुगल पे ला लिंक असलेला मोबाईल नंबर आरोपीस पाठविला. आरोपीने त्याच्या गुगल पे अकाऊन्टवरुन हाय मॅसेज करुन फिर्यादीस 65 हजार पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे पाठवलेनंतर अज्ञात आरोपी याचा लगेचच संशयिताचा फोन स्विच ऑफ लागला. यामुळे आयफोन मोबाईल देण्याच्या बहाण्याने आपली 65 हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादीने वाई पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हा गुन्हा मोबाईलव्दारे तांत्रीक पध्दतीने केला असल्याने पो. नि. आनंदराव खोबरे व त्यांचे सह कर्मचारी यांनी या गुन्हयाचा तपास कसून करण्यास सुरुवात केली. गुन्ह्यावेळी आरोपी याने वापरलेला मोबाईल बंद केल्याने तपास करणे अवघड झाले होते. परंतु, आरोपीने फसवणुक कशा प्रकारे केली आहे, याची पूर्ण माहिती काढून त्याचा शोध घेण्याकामी खास पथक तयार करुन आरोपीचा पुणे येथे जावून शोध घेतला. अखेर दि. 12 रोजी रात्री 11.35 च्या सुमारास संशयीत किरण गणपती गायकवाड वय 35 सध्या राहणार उत्तरेश्‍वरनगर, लेन नंबर 6, लोहगाव पुणे मुळ रा. संगमेश्‍वरनगर, सूत मील समोर, अक्कलकोट रोड सोलापूर जि. सोलापूर पथकाने शिताफीने पकडले. आरोपीने हा गुन्हा साथीदार गणेश अशोक भालेराव रा. पुणे याच्यासमवेत केल्याचे गायकवाड याने कबुल केले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व फसवणूक केलेली रक्कम 65 हजार हस्तगत केली आहे. त्याने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबतच तपास चालू आहे.

 ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. खोबरे, सहा. पो. फौजदार पवार, सहा. पो. फौजदार शिर्के, पो. कॉ. बल्लाळ पो.कॉ.राठोड , पो.कॉ . निंबाळकर यांनी केली. 


Tags: क्राइमसातारा
Previous Post

काेराेनातही कंपन्यांनी जमवला सर्वाधिक निधी; आरोग्य, डिजिटल कंपन्यांत गुंतवणुकीसाठी स्पर्धा

Next Post

आंदोलनाचा 19वा दिवस : शेतकरी म्हणाले – रातोरात संघटना उभ्या, नावेही ऐकली नाहीत

Next Post

आंदोलनाचा 19वा दिवस : शेतकरी म्हणाले - रातोरात संघटना उभ्या, नावेही ऐकली नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिंती येथे एकास नऊ जणांकडून मारहाण

मे 29, 2023

निंबळकजवळ बुलेट गाडीच्या अपघातात युवक ठार

मे 29, 2023

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

मे 29, 2023

वाठार फाटा येथील अपघातात दोघे जखमी

मे 29, 2023

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; उपळवे येथील घटना

मे 29, 2023

पृथ्वी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक पोलीस असून अडचण नसून खोळंबा

मे 29, 2023

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल – डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

पालखीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मे 29, 2023

नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह

मे 29, 2023
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे विध्यार्थी

“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!