
फलटण शहरात भारतीय संविधान दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. १८ जुलै : फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय संविधान दिंडीचे आगमन झाले. या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून दिले. भारतीय संविधान समता, न्याय, बंधुता आणि ऐक्योपासना दर्शवते, असे धन्यकुमार गोडसे म्हणाले. तसेच, संविधानामुळेच आपल्यासारखा एका शेतकऱ्याचा मुलगा उच्च पदावर पोहोचू शकला, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस निरीक्षक बल्लाळ, भीम जयंती महोत्सवाचे अध्यक्ष हरीश काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड, आरपीआयचे नेते विजय येवले, संजय निकाळजे, राजाभाऊ मारुडा, नगरसेवक सचिन अहिवळे, सुपर्णा अहिवळे, मीनाक्षी काकडे, पत्रकार गोविंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. इतर मान्यवरांनीही संविधानाविषयी आपले विचार मांडले.
