
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२६ | फलटण |
काही दिवसांपूर्वी साखरवाडी (ता. फलटण) येथील फिर्यादी बाळासाहेब आबासाहेब चव्हाण यांचे घरामधून अज्ञात चोरटयाने सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्याबाबत फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना पकडूनचोरीस गेलेले दागिने हस्तगत केले होते. हे दागिने सोमवारी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत सुबनावळ, दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक यांचे उपस्थितीत फिर्यादीस परत देण्यात आले.
यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करून सोने परत मिळवून दिल्याबद्दल आभार मानले.
दुसर्या चोरीच्या गुन्ह्यातील फिर्यादी तुषार अभंग व संतोष जगताप, रा. विडणी यांच्या विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने नेल्या होत्या. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार निष्पन्न करून चोरीस गेलेल्या मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या. हेही मोटारी फिर्यादीस परत देण्यात आल्या.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रशांत सुबनावळ सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितिन, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, हनुमंत दडस यांनी केली.