फलटण: आर्ट ऑफ लिव्हिंगकडून वारकऱ्यांची चरणसेवा – उपक्रमास प्रतिसाद

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी वारकऱ्यांची भावपूर्ण चरणसेवा केली.

स्थैर्य, फलटण, दि. 18 जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने वारकऱ्यांची भावपूर्ण चरणसेवा करण्यात आली. या सेवाभावी उपक्रमात स्वयंसेवकांनी वारकऱ्यांचे पाय स्वच्छ धुऊन त्यांची सेवा केली.

“सेवा हीच खरी साधना” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकऱ्यांनी मनापासून प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

या सेवाकार्यात आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे स्वयंसेवक बाळासाहेब बिचुकले, सचिन ताम्हाणे, अमोल ठणके, सचिन सोनवलकर, साईराज यादव, सार्थक चिकणे, सार्थक सोनवलकर, पार्थ कदम आणि अक्षय वावरे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी लाभल्याचा आनंद स्वयंसेवकांनी व्यक्त केला. भविष्यातही समाजोपयोगी आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प या सर्वांनी यावेळी व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!