
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२६ | फलटण |
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांचे (एसआयआर) सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी दिनांक ३१/०८/२०२६ रोजी करणेत आली आहे. यानुसार एसआयआरच्या विहीत कालावधीमध्ये २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही अशा अनमॅप मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये येणेकामी त्यांना सुनावणीची संधी देण्यात आली आहे. अशा मतदारांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यासह उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे-

वरीलप्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबतच्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे, ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही अशा अनमॅप मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये राहणेसाठी दिनांक ३१/०८/२०२६ (सोमवार) ते ३०/०२/२०२६ (बुधवार) या कालावधीमध्ये नोटीस प्राप्त झालेनंतर सुनावणीसाठी निश्चित केलेल्या दिवशी उपस्थित राहून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेली पुराव्याची कागदपत्रे सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांना सादर करावीत. तसेच ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ठ करता आलेली नाहीत अशा गैरहजर/स्थलांतरित/मृत/दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्ष व मतदारांच्या माहितीकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सर्व ग्रामपंचायती यांचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.

तसेच एएसडीडीपैकी एखाद्या मतदाराचे नाव वगळण्यावर कोणासही आक्षेप/हरकत असल्यास तीदेखील वरीलप्रमाणे विहीत कालावधीमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.