
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२६ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, केंद्र फलटण यांच्या वतीने शनिवारी (दि. २८ ऑगस्ट) फलटण येथील श्रीराम मंदिरात मारुती स्तोत्र पठण व रामरक्षा पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेकडो भाविकांनी ‘मारुती स्तोत्र पठण’ केले.
यावेळी सौ. पुष्पाताई कदम, सौ. नातू, सौ. वृंदा सहस्त्रबुद्धे, सौ. स्नेहल तगारे, सौ. नियोजिता केंजळे, सौ. रेवती गोसावी यांनी कार्यक्रमाचे व्यासपीठ चालवले आणि उपस्थित भाविकांकडून स्वरबद्ध आवाजात मारुती स्तोत्र आणि रामरक्षा पठण करून घेतले. या कार्यक्रमामुळे श्रीराम मंदिरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. सदर कार्यक्रमामध्ये रामनाम जप होऊन शेवटी श्री. व सौ. सुभाष देशपांडे यांच्या हस्ते आरती झाली व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फलटण केंद्राचे श्री. निखिल केसकर, श्री. विभूते, श्री. विष्णुप्रद, श्री. सचिन कुलकर्णी, श्री. अतुल पेंढारकर, श्री. किरण गोगटे, श्री. नितीन लटकर, सौ. श्रुती इनामदार, श्री. जयंत सहस्त्रबुद्धे, श्री. मुकुंदराव जोशी, श्री. अमेय चिटणीस, श्री. मंगेश पेटकर, डॉ. श्रीपाद चिटणीस यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी श्री. नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टने मोलाचे सहकार्य केले.
पुढील कार्यक्रम:
शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सरता श्रावणी शनिवार असून त्याच दिवशी गोपालकाल्यानिमित्त मारुती स्तोत्र आणि रामरक्षा पठणा बरोबरच श्री विष्णू सहस्रनाम आणि गीता १५ वा अध्याय पठणाचा कार्यक्रम होणार आहे. श्रीविष्णू सहस्त्रनाम पठण करताना श्रींचे मूर्तीला सहस्त्र तुलसी अर्जन होणार आहे. त्यानंतर आरती आणि प्रसाद गोपाळकाल्याचे वाटप होईल.
फलटणमधील सर्व बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण केंद्राचे प्रमुख श्री. चंद्रशेखर दाणी यांनी केले आहे. सदरचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.