गाढ झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीने पहाटेचा रॉड टाकला

चारित्र्याचा संशय, सातार्‍यातील घटना

दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२६ | सातारा |
सातार्‍यातील समर्थ मंदिर परिसरातील एका घरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रॉड डोक्यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्‍यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली.

पती सुनीता प्रदीप चव्हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव असून पती प्रदीप हणमंत चव्हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. प्रदीप हा ट्रकचालक आहे. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजीही पती-पत्नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने पहाटेच्या सुमारास रॉड मारून तिचा खून केला.

Back to top button
Don`t copy text!