डॉ. रुपनवर आत्महत्येप्रकरणी डॉ. लीला मदने निलंबित

दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२६ | फलटण |
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त, संचालक संजय काटकर यांनी निलंबित केले. डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्हा आरोग्य विभागातील वर्ग एकच्या चार अधिकार्‍यांसह एकूण आठ जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. डॉ. मदने यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील गंभीर घटना, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांशी असंवेदनशील व कठोर संवाद साधणे आदी बाबी लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील चौकशी समितीने २० ऑगस्ट रोजी चौकशी अहवाल सादर केला. तत्पूर्वी फलटण पोलिसांनी २९ जुलै रोजी फिर्यादीची खबर सादर केली. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी डॉ. मदने यांच्या निलंबनाचा आदेश आरोग्य संचालकांनी काढला.

Back to top button
Don`t copy text!