
स्थैर्य, फलटण, दि. ४ नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाने फलटण नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी सुरू होईल व १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असेल.
अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी केली जाईल. उमेदवारांना २१ नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.
२६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
