
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटणच्या वतीने आयोजित मोफत वारकरी दवाखान्यात १००० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार देण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. १७ जुलै : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटणच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मोफत वारकरी दवाखान्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात १००० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले, अशी माहिती केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर दाणी यांनी दिली.
विविध संस्थांचा सहभाग
ब्राह्मण गल्लीतील ओंकार अपार्टमेंट येथे हा वैद्यकीय उपक्रम घेण्यात आला. यासाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान, मेडिकल असोसिएशन फलटण आणि धर्मार्थ सेवा संस्था यांनी विशेष सहकार्य केले. सकाळी नऊ वाजता पूजा देखणे, अवधूत गुळवणी, प्रसाद जोशी, मिलिंद नेवसे, सिद्धाली शहा, विशाल तेली, पप्पू शेख, रुपाली जाधव, अनुप शहा, किशोर निंबाळकर आणि श्रीपाद विभूते यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली.
वैद्यकीय पथकाची सेवा
वैद्यकीय पथकातील धनंजय विष्णूप्रद, हेमंत घोडके आणि सचिन कुलकर्णी यांनी रुग्णांना औषधे आणि पिण्याचे पाणी दिले. या वैद्यकीय शिबिरात उज्ज्वल म्हेत्रे, डी. जी. देशपांडे, जयंत जगदाळे, प्राची जोशी, अरुण अभंग, श्रीपाद चिटणीस, विक्रांत रसाळ, श्रुती थिटे, जयंत गावडे, महेश बर्वे, कल्याण बोबडे आणि राजगोपाल खंडेलवाल यांनी वारकऱ्यांची तपासणी केली.
या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महेंद्र पवार, सत्यजित घोरपडे, मुकुंद जोशी यांच्यासह अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे पदाधिकारी आणि ओंकार अपार्टमेंटमधील सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.