
स्थैर्य, नागठाणे, दि.२३: पुणे- बैंगलोर महामार्गावर बोरगांव (ता. सातारा)गावच्या हद्दीत चिकोडी (कर्नाटक) येथून पुण्याचा दिशेने निघालेल्या कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.भुजंगराव दामोदर जोशी (वय 74) असे मृताचे नाव आहे.कारमधील बाकीचा तीन प्रवासी आणि ड्रायव्हर हे जखमी झाले.या अपघाताची नोंद बोरगांव पोलिसांत दाखल झाली आहे.
मंगळवारी दुपारी हा अपघात झाला.महामार्गावर भरधाव जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने कारने महामार्गावरच तीन-चार पलटी खाल्या.त्यानंतर कार मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन थटली.अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. या अपघातात नंदाताई भुजंगराव जोशी वय 62,अनुराधा प्रशांत घुमे वय 36,श्रीधर प्रशांत घुमे वय 19 चालक चिन्मय प्रकाश साधले वय 24 जखमी झाले असून घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम कराड महामार्ग पोलीस मदत केंद्रा चे रघुनाथ कळके साहेब, ए पी आय राजू बागवान, ए पी आय बशीर मुलाणी यांनी तातडीचे मदत कार्य केले आहे