संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने चर्मकार समाज वधू-वर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ मे २०२४ | फलटण |
येथील संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांच्यावतीने रविवार, दि. १२ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे चर्मकार समाज वधू-वर व पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटणचे अध्यक्ष भोलेनाथ भोईटे व अरुण खरात यांनी केले आहे.

महामेळाव्याबाबत माहिती देताना चर्मकार वधू – वर सूचक केंद्र समिती, फलटणचे अध्यक्ष प्राचार्य विठ्ठल हंकारे व सचिव संतोष पोटफोडे यांनी सांगितले की, चर्मकार समाजातील सर्व स्तरातील मुलांचे – मुलींचे व रखडलेले विवाह योग्यरित्या लवकरात लवकर व्हावेत म्हणून या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्हे समाविष्ट असून शिक्षीत, अशिक्षीत, घटस्फोटित, विधूर, विधवा अशा वधू-वरांचा समावेश असणार आहे.

सदर मेळाव्यास येताना मुलगा/मुलगी स्वत: व पालकही त्यांच्यासमवेत असावेत. मुलगा / मुलगी यांचा ४ बाय ६ आकाराचा फोटो आणावा, असेही संयोजकांनी सांगितले आहे.

महामेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी भोलेनाथ भोईटे (९४२२३८४४९९), अरुण खरात (८४२१८३९३५१), प्राचार्य विठ्ठल हंकारे (९४२१११९६६७), संतोष पोटफोडे (८८८८११०१२३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!