सुजैन खानने अटकेच्या बातमीवर दिलं स्पष्टीकरण, पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती


 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुजैन खानला मंगळवारी मिडियाच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी समजली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईमध्ये २२ डिसेंबर पासून ते ५ जानेवारी पर्यंत रात्रीच्या संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ३४ लोकांसोबत हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुजैन खान, गायक गुरु रांधवा आणि क्रिकेटर सुऱेश रैना यांच्यावर केस दाखल केली गेली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता सुजैन खानने सोशळ मिडियावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने ही बातमी चुकीची असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली.

सुजैनने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं, माझं सविनय स्पष्टीकरण- मी काल रात्री एका जवळच्या मित्राच्या बर्थ डे डिनरसाठी गेले होते. आमच्यामधील काही लोक जेडब्ल्यु मॅरिएट, सहार मधील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये पोहोचले. २.३० वाजता अधिकारी क्लबमध्ये आले. जेव्हा क्लब मॅनेजमेंट आणि अधिकारी गोष्टी सांभाळत होते तेव्हा तिथे हजर असलेल्या सगळ्या गेस्टना ३ तास वाट पाहायला सांगितलं गेलं. आम्हाला अखेर ६ वाजता जाऊ दिलं. त्यामुळे मिडियाने असे अंदाज बांधायला सुरुवात केली की तिथे अटक करण्यात आली आहे जे पूर्णपणे चूकीचे आणि बेजाबदार आरोप होते. 

सुजैनने पुढे लिहिलं, मला हे समजलं नाही की आम्हाला का थांबवून ठेवलं आणि अधिकारी आणि क्लब यांचं काय प्रकरण होतं. मी या माझ्या प्रतिक्रियेसोबत सगळ्या गोष्टी स्पष्ट करत आहे. मी मुंबई पोलिसांना खूप आदर करते की ते आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत असतात. त्यांच्या तत्परतेशिवाय मुंबईकर्स सुरक्षित नाही राहू शकत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!