डीएमके, एआयडीएमकेशी युती नाही : कमल हसन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, चेन्नई, दि.२३: आगामी २0२१
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि मक्कळ नीधी
मैयमचे प्रमुख कमल हसन यांनी महत्वाची घोषणा केली. माध्यमांशी बोलताना कमल
हसन म्हणाले की, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मक्कळ नीधी मैयम कोणत्याच
कळगम पक्षाशी युती करणार नाही.कमल हसन सध्या राज्यव्यापी दौरा करीत असून
त्यांनी प्रचार आणि संपर्कात आघाडी घेतली आहे. सोमवारी कमल हसन यांनी
आपल्या प्रचार अभियानाच्या दुस-या भागाची सुरवार कांचीपुरम येथे
मिरवणुकीद्वारे केली. यावेळी कमल हसन यांची एक झलक टिपण्यासाठी चाहते तसेच
नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली. कमल हसन यांनी आपल्या खास आणि पारंपारिक
शैलीत खुल्या वाहनातून नागरिकांचे अभिवादन स्वीकारले.

काही दिवसांपूर्वी अभिनेते कमल हसन
म्हणाले होते की, २0२१ तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मी नक्की निवडणूक
लढविणार मात्र कोणत्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविल याबाबत नंतर
घोषणा केली जाईल. रजनीकांत यांच्यासोबत संभाव्य युतीबाबत कमल हसन म्हणाले
की, राज्याच्या नागरिकांसाठी तसेच विचारधारा आणि कार्यक्रमावर एकमत झाल्यास
एकत्र येण्यास हरकत नाही, आम्ही एका फोनवर संपर्कात असतो परंतु सध्या यावर
भाष्य करणे योग्य आणि प्रासंगिक नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!