विनापरवानगी माहिती पत्रकावर माझा फोटो छापला : दशरथ निगडे


 

स्थैर्य, शिरवळ, दि.१५: शिरवळ ता.खंडाळा येथील सध्याच्या विद्यमान सरपंच लक्ष्मी पानसरे यांना 2017 साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये सरपंचपदी निवडून आण्याकरिता पक्षाच्या विरोधात जाऊन जीवाचे रान केले. परंतु निवडून आल्यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये सरपंचानी गावाचे विकासकामाबाबत कोणताही निर्णय घेताना मला कधीही विश्‍वासात न घेता कायमच मला डावलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संकट येताच आता आमची आठवण कशी आली मला न विचारताच माहिती पत्रकावर माझा फोटो छापला गेल्याचे माझ्या निदर्शनास आले असून त्यांना कशी माझी संकटसमयी आठवण आली याचा प्रश्‍न मला पडला आहे. त्यामुळे माहिती पत्रकावर माझा फोटो छापून शिरवळच्या जनतेमध्ये संबंधितांनी गोंधळ निर्माण करीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी छापलेल्या माहिती पत्रकावरील फोटोवरून त्यांनी चालवलेली शिरवळच्या जनतेची दिशाभूल थांबवावी . शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याशी कोणताही राजकीय संबंध माझा राहिलेला नाही अशी माहिती शिरवळचे माजी सरपंच दशरथ निगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!