“स्थैर्य”ची वाटचाल अभिमानास्पद : खासदार रणजितसिंह


दैनिक स्थैर्य | दि. 15 जानेवारी 2024 | फलटण | आधुनिकतेची कास धरुन ‘स्थैर्य’ने सुरु ठेवलेली वाटचाल अभिमानास्पद असून दिनदर्शिकेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

दैनिक स्थैर्य च्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कोळकी येथील विश्रामगृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी दिनदर्शिकेच्या निर्मितीविषयी माहिती दिल्यानंतर खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिनदर्शिका निर्मितीसोबतच स्थैर्यच्या न्यूज पोर्टल, युट्यूब चॅनेल व सोशल मिडीया प्लॅटफॉमवरील वाटचालीबाबतही सविस्तर माहिती घेतली.

कार्यक्रमास फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रभारी सचिन कांबळे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते लतीफ तांबोळी यांच्यासह फलटणचे विविध पत्रकार उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!