लायन्स पतसंस्थेच्या चेअरमनपदी शैलेंद्र शहा तर द्वारकादास भट्टड व्हाईस चेअरमन


दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2024 | फलटण | लायन्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटणच्या संचालक मंडळाची सन २०२४ ते २०२९ साठीची निवडणूक बिनविरोध नुकतीच संपन्न झाली. संचालक मंडळ निवडीनंतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रसिद्ध करसल्लागार शैलेंद्र शहा यांची तर व्हाईस चेअरमनपदी द्वारकादास भट्टड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लायन्स नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

लायन्स नागरी सहकारी पतसंसंस्थेच्या संचालक मंडळात दिलीप गुंदेचा, शैलेंद्र शहा, भट्टड, सुहास निकम, विवेक गायकवाड, नितीन गांधी, राजकुमार मेहता, मंगेश दोशी, सौ. विद्या गांधी, सौ. गायत्री शहा, दादासाहेब शेंडे, दादासाहेब पिसाळ, संभाजी अडगळे यांचा समावेश आहे.

लायन्स नागरी सहकारी पतसंसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीनंतर पतसंस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमनपदी शैलेन्द्र शहा तर व्हाईस चेअरमन पदी द्वारकादास भट्टड यांची निवड सुद्धा बिनविरोध संपन्न झाली.

या निवडीदरम्यान राजेंद्र शहा व भोजराज नाईक निंबाळकर यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!