गोडोलीत विवाह सोहळ्यास 50 पेक्षा जास्त लोक हजर – लग्नमालक, धनलक्ष्मी मंगल कार्यालय मालकावर गुन्हा दाखल


स्थैर्य, सातारा, दि. २३: गोडोली, सातारा येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात दि. 21 रोजी पार पडलेल्या विवाह सोहळ्याला शासनाच्या नियमाचे उल्लंघन होवून सुमारे 250 लोक उपस्थित होते. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी लग्नमालक मोहनदास सदाशिव इंदलकर रा.कळंबे ता.जि.सातारा, राजकुमार तुकाराम यादव रा. करंजे पेठ, सातारा आणि कार्यालयाचा मालक राजेंद्र प्रभाकर साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी, जिल्हाधिकारी यांनी कोवीडचा प्रादुर्भाव वाढु नये याकरीता मनाई आदेश काढलेले आहेत. त्यानुसार 50 पेक्षा जास्त लोक कार्यक्रमांना उपस्थित राहू नये, अशा सुचना होत्या. परंतु, धनलक्ष्मी कार्यालयात मोहनदास सदाशिव इंदलकर, राजकुमार तुकाराम यादव यांनी दि. 21 रोजी धनलक्ष्मी मंगल कार्यालय गोडोली सातारा येथे विवाह सोहळा आयोजीत करुन यावेळी सुमारे 250 लोकांचा समुदाय गोळा केला. तसेच मंगल कार्यालयाचे मालक राजेंद्र प्रभाकर साळुंखे यांनी त्यांना संमती दिली आहे.

याप्रकरणी साथरोग अधिनियम कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल खाडे, सचिन नवघणे, चेतन ठेपणे यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!