आदित्यनाथांवर मनसेचा ‘ठग’हल्ला


 

स्थैर्य,मुंबई,दि  २ : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनंतर आता मनसेनेही जोरदार टीका केली आहे. मनसेने आदित्यनाथ उतरलेल्या हॉटेलसमोरच पोस्टर लावत ‘ठग’ असे संबोधल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही दिली. तसेच हिंदीच नाही तर मराठी सिनेमेदेखील बनविणार असल्याचे तिथल्या अध्यक्षाने जाहीर केले होते.

एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्या आल्या अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. तसेच ते इतर दिग्दर्शक, अभिनेत्यांचीही भेट घेणार आहेत. यावर मनसेने निशाना साधला आहे. ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली..’; कुठे महाराष्ट्राचे वैभव, तर कुठे युपीचं दारिद्र्य, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी युपीला नेण्याचं मुंगेरीलालचे स्वप्न असे हिणवत ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपविण्यासाठी मुंबईतील उद्योग पळविण्यासाठी आलेला ‘ठग’, असा पोस्टर मनसेने लावला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये उतरले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Don`t copy text!