दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । फलटण । राज्याचे महसूल मंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील हे आज फलटण दौऱ्यावर आले आहेत. पालखी मार्गाची पाहणी करत असताना सुरवडी येथे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांच्या घरी मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील हे चहापानासाठी थांबल्यामुळे तालुक्यामध्ये विविध चर्चांना उधाण आलेले आहे.
महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील हे सध्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाची, पालखी निवासाची व पालखी विसाव्याची तयारी जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये असताना फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांच्या सुरवडी येथील निवासस्थानी राधाकृष्ण विखे पाटील हे चहापानासाठी थांबल्यामुळे तालुक्यामध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.