क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 8 बाधित रुग्ण पूर्णपणे बरे आज सोडले घरी


स्थैर्य, सातारा दि. 21 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये तरडगाव ता. फलटण येथील 67 वर्षीय महिला व 6 वर्षाचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली ता. सातारा येथील 18 वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील 23 वर्षीय पुरुष, त्रिपूटी ता. कोरेगाव येथील 36 वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा 18 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत. यांना आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 106 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!