129 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 70 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


स्थैर्य, सातारा दि. 21 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 11, ग्रामीण रुग्णालय, वाई 7 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 119 जणांचा अहवाल निगेटिव्ह तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचा असे एकूण 129 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

70 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

दि.20 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57 असे एकूण 70 जणांना केले विलीकक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 19 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 181 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 79 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 4 रुग्ण आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!