आर्यन च्या मृत्यूचे गूढ वाढले


मृतदेह लपविल्याने वडीलांवर गुन्हा दाखल

स्थैर्य, सातारा, दि. 20 : जावली तालुक्यातील म्हते खुर्द येथील मृत  आर्यन दळवी चे आई-वडील व भावाचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे .यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे.

 दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून आशा आणि अंगणवाडीसेविकांचे पासून दळवी यांनी सर्व माहिती लपवली म्हणून आर्यन चे वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी दिली. आर्यन दळवी चा मृत्यू होऊन घरातच तीन दिवस आई-वडिलांनी त्याचा मृतदेह ठेवला होता .रविवारी ही घटना उघडकीला आल्यानंतर संपूर्ण तालुकाच नव्हे तर जिल्हा हादरून गेला .दरम्यान आर्यन चा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र याबाबतचा तपासाला आता गती मिळणार आहे. पोलीस परिसरातील सर्वांची  कसून चौकशी करीत आहेत. करोना पार्श्वभूमीवर जावली तालुका प्रशासनाने त्यांच्या घरातील तिघांचे  swab करोना तपासणीसाठी पाठवून त्यांना रायगाव येथील विलगी करण कक्षात ठेवण्यात आले होते .या तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे म्हाते खुर्द ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे .आर्यन चा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह घरातच लपपून ठेवण्याची घटना परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे उघडकीस आली. पोलिसात त्याच्या मृत्यूची नोंद आकस्मित अशी करण्यात आली होती. मात्र आर्यन यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ?त्याचा मृतदेह घरात तसाच तीन दिवस का ठेवण्यात आला? हे सगळे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान आर्यनचे आई ,वडील व मोठा भाऊ यांची कोरोना टेस्ट घेण्यासाठी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पोलिस तपासाला गती मिळणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!