कोळकी: ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने’चा लाभ घेण्याचे जयकुमार शिंदे यांचे आवाहन

कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील स्थिर व फिरत्या पथविक्रेत्यांसाठी व्यवसाय वाढवण्याची सुवर्णसंधी; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची अंमलबजावणी.

स्थैर्य, कोळकी, दि. १२ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने’चा (PM-SVANidhi) कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व स्थिर व फिरत्या पथविक्रेत्यांनी आणि तरुणांनी लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन जयकुमार शिंदे यांनी केले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कोळकीमध्ये केली जात आहे.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे आणि विशेष आकर्षण:

गावातील बेरोजगार युवक आणि छोट्या व्यावसायिकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

  • पथविक्रेत्यांना अत्यंत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे.

  • नियमित कर्ज परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे.

  • डिजिटल व्यवहारांना चालना देणे; डिजिटल स्वरूपात (QR Code) पेमेंट स्वीकारल्यास दरमहा १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक.

  • नियमित परतफेडीवर दर तिमाही ७ टक्के व्याज परतावा मिळण्याची सुविधा.

लाभाचा तपशील (कर्जाचे टप्पे):

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन टप्प्यांत कर्ज उपलब्ध करून दिले जाते:

  • प्रथम कर्ज: रु. १५,०००/- (परतफेड कालावधी १२ महिने)

  • द्वितीय कर्ज: रु. २५,०००/- (परतफेड कालावधी १८ महिने) – विशेष बाब म्हणजे दुसऱ्या कर्जानंतर ‘क्रेडिट कार्ड’ सुविधा उपलब्ध होते.

  • तृतीय कर्ज: रु. ५०,०००/- (परतफेड कालावधी ३६ महिने)

आवश्यक कागदपत्रे:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: १) आधार कार्ड २) पॅन कार्ड ३) बँक पासबुक ४) कोळकी ग्रामपंचायतीची बाजार वसुली फी पावती ५) आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ६) युपीआय आयडी (UPI ID)

ही योजना पथविक्रेत्यांना ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी एक मोठी संधी आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी याचा लाभ घेण्यासाठी कोळकी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जयकुमार शिंदे यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!