रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून रावडी खुर्द (महाडुंगवाडी) येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२६ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून व आमदार सचिन पाटील यांच्या शिफारसीतून तसेच फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रावडी खुर्द (महाडुंगवाडी) येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबत उर्वरित महाडुंगवाडी (शिवरस्ता) ते पाडेगाव-साखरवाडीपर्यंतच्या रस्त्याचेही भूमिपूजन संपन्न झाले.

रावडी खुर्द गावांतर्गत असलेल्या महाडुंगवाडी वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याचे काम ३० वर्षांपासून रखडले होते. ते आज मार्गी लागल्याच्या भावना यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास रावडी खुर्दमधील ज्येष्ठ नेते बापूराव करचे, बाजीराव होळकर, काशिनाथ सोडमिसे, धनसिंग होळकर, बाबासो होळकर, हनुमंत होळकर व युवा कार्यकर्ते तुळशीदास होळकर, मयूर शिंदे, अक्षय सोडमिसे, पांडुरंग होळकर, भानुदास होळकर, राहुल करचे, दिग्विजय होळकर आदी उपस्थित होते..

यावेळी आमदार सचिन पाटील व प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी प्रलंबित कामांवर चर्चा केली व ते येत्या काळात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Back to top button
Don`t copy text!