वीर धरण १०० टक्के भरले; विसर्ग वाढवला

दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२६ | लोणंद |
नीरा खोर्‍यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून वीर धरणात पुन्हा शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने २४,२८५ क्युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यात आले आहे. वीर धरणाच्या सांडव्यावरून २३ हजार १८५ क्युसेक व एस्केपमधून ११०० क्यूसेक असा २४,२८५ क्यूसेक इतका विसर्ग नीरा नदीपात्रात करण्यात आला आहे.

नीरा-देवघर, भाटघर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातील पाणीपातळी वाढत आहे. भाटघर धरणात सुमारे ७० टक्के, नीरा-देवघर धरणात ७६ टक्के, वीर धरणात १०० टक्के, गुंजवणी धरणात ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!