राजाळेच्या श्री जानाई हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे इयत्ता सातवी स्कॉलरशीप परीक्षेत उल्लेखनीय यश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२६ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित श्री जानाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज, राजाळे या विद्यालयातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (एप्रिल २०२६) इयत्ता सातवीमध्ये १) आरूष युवराज निंबाळकर २) पुष्कर भरत शिंदे ३) कु. सिद्धी हनुमंत कोळेकर ४) कु. आर्या कोळेकर शिवाजी विद्यार्थी पात्र झाले आहेत.

या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा सविता सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाच्या सदस्या सौ. ज्योती सूर्यवंशी (बेडके), विद्यालयाचे प्राचार्य जाधव, पर्यवेक्षिका काकडे तसेच मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!