
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२६ | फलटण |
स्वत:ला भोवळ आल्याने घरी सोडण्यासाठी आपल्या दुचाकीची चावी जवळच उभ्या असलेल्या तरुणाच्या हातात दिल्यानंतर त्या तरुणाने विश्वासघात करीत दुचाकी घेऊन पलायन केल्याची घटना सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरट चौकात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश मारुती पाटील (वय ४४, रा. बोरखळ, ता. सातारा) हे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दुचाकी घेऊन असताना त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांनी तेथे असणार्या एका तरुणाला आपल्याला दुचाकीवरून घरी सोडता का, अशी विनंती केली. त्यानंतर संबंधित तरुणाने होकार देत त्यांच्याकडून चावी घेतली आणि काही क्षणात दुचाकी सुरू करून दुचाकीसह तेथून पलायन केले.
या घटनेनंतर महेश पाटील यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
