स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कराड जनता बॅंकेच्या चार कर्जदारांमुळे दोन लाख ठेवीदार वेठीस

Team Sthairya by Team Sthairya
December 10, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, कराड, दि.१०: नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेल्या कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेच्या कारभाराला अखेर काल रिझर्व्ह बॅंकेनेच पुढाकार घेत पूर्णविराम दिला. सहकार खात्याने बॅंक दिवाळखोरीत आल्याचे जाहीर करत अवसायानिक तेथे नेमला. एका दिवसात बॅंकेची दिवाळखोरी जाहीर झाली नाही, अनेक वर्षांपासूनच्या चुकांचे एकत्रीकरण झाल्याने कऱ्हाड जनता बॅंक दिवाळखोर ठरली. त्यामध्ये केवळ चारच कर्जदार असे आहेत. ज्यांच्या थकीत कर्जाची रक्कन 522 कोटींच्या आसपास आहे, जी बॅंकेने वसूलच केलेली नाही. त्यातही दोघांना विनातारण कर्जे दिली. त्याची रक्कमही कित्येक कोटींत थकीत आहे. त्यामुळे कर्ज देण्याची मर्यादा असतानाही त्या नियमांना डावलून दिलेल्या कर्जाचा डोंगर बॅंकेच्या दिवाळाखोरीस कारणीभूत ठरला.

कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेची स्थापना 1962 मध्ये झाली. बॅंक परवाना त्यांना
1986 मध्ये मिळाला. त्यानंतर बॅंकेने विशेष प्रगती केली. मात्र, त्यामध्ये
1990 नंतर होणारा कारभार अधिक चर्चैचा ठरला. त्यानंतरच्या कालावधीत कऱ्हाड
जनता बॅंकेला उपनिबंधक कार्यालय, सहकार खाते, रिझर्व्ह बॅंकेककडून वेळोवेळी
सावध करण्याचा प्रयत्न झाला, त्याकडे विशिष्ठ चष्म्यातून पाहणाऱ्या संचालक
मंडळांच्या कारभाऱ्यांचा बेफीकरपणाही तितकाच कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे
कर्जे थकत गेली. मंजूर मोठ्या कर्जाच्या रक्कम एकाच दमात देण्याची त्यांची
पद्दतही बॅंकेला गोत्यात आणणारी ठरली आहे. मोठी कर्जे देताना बोगस
कागदपत्रे करणे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज वाटणे अशा अनेक कारणांनी
दिलेली कर्जे बॅंकेच्या विविध अवैध व्यवहाराला अधोरेखीत करत गेली.
त्यामुळेही अनेक गैरप्रकार स्पष्ट होत गेले. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेला
ठेवीदारांच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावा लागला, असे आदेशात स्पष्ट नमूद
केले आहे. कऱ्हाड जनता बॅंकेच्या ठेवीदारांची संख्या दोन लाख तीन हजार 301
इतकी आहे. त्यांच्या ठेवींचा आकडा 511 कोटी 39 लाख आठ हजार आहे. त्यामध्ये
429 कोटी 43 लाख 67 हजारांच्या ठेवी पाच लाखांच्या आतील आहेत. तर 587
ठेवीदारांच्या ठेवी 81 कोटी 95 लाख 41 हजारांच्या आहेत. मात्र, त्या उलट
चारच कर्जदारांच्या थकीत कर्जाचा आकडा 522 कोटींवर गेला आहे. मात्र,
त्यांच्याकडे वसुलीचा काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे बॅंकेच्या 577
कोटींच्या ठेवींच्या बदल्यात दिलेल्या थकीत कर्जाची रक्कम जवळपास मॅच होत
गेली. त्यामुळेही आर्थिक कोडी निर्माण झाली. त्याचा परिणाम बॅंकेच्या
व्यवहारावर झाल्यानेच बॅंकेवर दिवाळखोरीची वेळ आली. 

कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेने चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर
कारखान्यास 45 कोटी, कडेगाव येथील डोंगराई सहकारी साखर कारखान्यास 55 कोटी,
सांगली येथील फडतरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला 112 कोटी आणि कऱ्हाडातील
बिजापुरे ग्रुपला 98 कोटींची कर्जे दिली. त्या सगळ्याची कर्जे सध्या थकीत
आहेत. त्यामुळे आजची थकीत कर्जाची वसुली 522 कोटीवर गेली आहे. त्यात फडतरे
ग्रुपचे थकीत कर्जे 201 कोटी, बीजापुरे ग्रुपचे थकीत कर्ज 110 कोटी,
डोंगराईचे थकीत कर्ज 153 कोटी तर जरंडेश्वरचे थकीत कर्ज 58 कोटीवर गेले
आहे. वास्तविक त्या सगळ्यांच्या न्यायालयीन लढाया सुरू आहेत. यातील
बीजापुरे व फडतरे यांना विनाताराण कर्ज दिले आहेत. डोंगराई व जरंडेश्वरला
कर्ज देताना तारण आहे. डोंगराईचे कर्ज ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांना
दिले त्या कर्जात 104 लोकांचा समावेश आहे. त्यातील सर्वच लोक बेपत्ता आहेत.
जरंडेश्वरलाही ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांना कर्ज वाटप केले आहे.
त्याही कर्जात 157 लोकांचा समावेश आहे. त्यातील कोणी सापडत नाही, अशी
स्थिती आहे

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: कराड
Previous Post

शाहूपुरी पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघड; दोघांना अटक

Next Post

आश्रमशाळा 18 वर्षे अनुदानाच्या प्रतीक्षेत; अनुसूचित जातीवर अन्याय

Next Post

आश्रमशाळा 18 वर्षे अनुदानाच्या प्रतीक्षेत; अनुसूचित जातीवर अन्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद

August 11, 2022

पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

August 11, 2022

नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

August 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

August 11, 2022

दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव

August 11, 2022

ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्ज्चा शुभारंभ

August 11, 2022
सदाशिव पाटील

एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील

August 11, 2022

देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ म्युझिकल फ्लॅश मॉबचे आयोजन

August 11, 2022
कै रवींद्र पेंढारकर

दुःखद निधन – कै रवींद्र पेंढारकर

August 11, 2022

पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!