घाडगेवाडी: जनगणना प्रगणकाला कुत्र्याचा चावा – शिक्षकावर उपचार


घाडगेवाडीत जनगणनेचे काम करत असताना एका ४५ वर्षीय शिक्षक प्रगणकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. त्यांच्यावर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 23 मे : घाडगेवाडी (ता. फलटण) येथे जनगणनेचे काम करत असताना एका ४५ वर्षीय शिक्षक प्रगणकाला कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमी शिक्षकाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सध्या तालुक्यात आगामी २०२७ च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रगणनेचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत स्थानिक अधिकारी आणि शिक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. घाडगेवाडीत माहिती संकलित करण्याचे काम करत असताना एका शिक्षकावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केला.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत शिक्षकाला मदत केली आणि त्यांना उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात हलवले. घरोघरी जाऊन शासनाचे काम करणाऱ्या प्रगणकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला असून, ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.


Back to top button
Don`t copy text!