बिबी: रणजितदादांमुळे ३० वर्षांचा प्रश्न मार्गी; अमर चौक ते दत्त मंदिर रस्त्याचे डांबरीकरण होणार : किरण नलवडे


बिबी गावातील अमर चौक ते दत्त मंदिर या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन झाले. यामुळे ग्रामस्थांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

स्थैर्य, बिबी, दि. 23 मे : बिबी येथील अमर चौक ते दत्त मंदिर या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. गेली ३० ते ४० वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच आता या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्या सौ. किरण नलवडे यांनी व्यक्त केले आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात तर जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर व विलासराव नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या सौ. किरण नलवडे यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर हा रस्ता मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या ॲड. किरण नलवडे, संजय बोबडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल बोबडे, आळजापूरचे माजी सरपंच शुभम नलवडे, मनोहर बोबडे, अंकुश बोबडे, अण्णासाहेब बोबडे, माजी केंद्रप्रमुख संजय बोबडे, सुरेश गायकवाड, नामदेव बोबडे, अनिल बोबडे, रावसाहेब बोबडे, संदीप कचरे, सोपान कचरे, तानाजीराव बोबडे आणि भगवानराव बोबडे उपस्थित होते.

तसेच लक्ष्मण बोबडे, बिबी विविध विकास सोसायटीचे संचालक दिलीप बोबडे, माजी सैनिक शंकर बोबडे, आप्पासाहेब बोबडे, संदीप बोबडे, बापूराव चव्हाण, आप्पा पाटील, गजानन चव्हाण, अमोल शिंदे, राहुल बोबडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!