फलटण: वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईची मागणी – भीम आर्मीचा इशारा


फलटण शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मोका आणि एमपीडीए अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 23 मे : फलटण शहरात वेगाने वाढणारे शहरीकरण आणि गुन्हेगारीच्या घटना पाहता, कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेने केली आहे. गुन्हेगारांवर मोक्का आणि एमपीडीए (MPDA) सारख्या कायद्यांतर्गत कारवाई करून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज

शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, नियमित नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सराईत गुन्हेगारांना तडीपार करून त्यांना शहराबाहेर काढावे, जेणेकरून कायद्याचा धाक निर्माण होईल. दहशत आणि गुन्हेगारीमुक्त फलटण शहर करण्यासाठी या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, अशी भूमिका संघटनेने या निवेदनातून मांडली आहे.

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

भीम आर्मीच्या या मागणीनंतर आता पोलीस उपअधीक्षक आणि शहर पोलीस निरीक्षक नेमकी काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. हे निवेदन देतेवेळी संघटनेचे अजित मोरे, सुनील पवार, तेजस भोसले, तुषार जाधव आणि सनी पवार उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!