आयवूमीची स्वातंत्र्यदिन विशेष ऑफर


दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । मुंबई । भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली ओईएम आयवूमीने भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक आयवूमी ईव्ही स्कुटर पूर्णपणे मोफत मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ३० ऑगस्टपर्यंत आयवूमी ईव्ही शोरूमला दिलेल्या प्रत्येक भेटीदरम्यान ग्राहकांना आकर्षक लकी ड्रॉमध्ये भाग घेऊन ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कुटर मोफत मिळवण्याची संधी मिळेल. आयवूमी ईव्ही स्कुटर – शाश्वत व पर्यावरणस्नेही प्रवासाचे प्रतीक आहे.

आयवूमीचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. अश्विन भंडारी यांनी सांगितले, “स्वातंत्र्यदिन ऑफर सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना आयवूमी ईव्ही स्कुटर मोफत मिळवण्याची संधी देत आहोत. हा संस्मरणीय क्षण साजरा करत असताना, आमची तंत्रज्ञान प्रगती आणि पर्यावरणपूरक सेवासुविधा यांचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करवून देऊन ग्राहकांप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत.”

प्रमोशन कालावधीत कोणत्याही आयवूमी ईव्ही शोरूमला भेट देऊन ग्राहकांना आयवूमी ईव्ही स्कुटरसाठी लकी ड्रॉमध्ये भाग घेता येईल. एका निवड प्रक्रियेमार्फत भाग्यशाली विजेत्यांची निवड केली जाईल. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी तसेच ३० ऑगस्ट रोजी आयवूमीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर याबाबतची घोषणा केली जाईल.

सुबक व स्टायलिश डिझाईन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा मिलाप असलेल्या या स्कुटरने शहरी भागातील प्रवासाची नवी व्याख्या रचली आहे. प्रभावी रेंज आणि दमदार कामगिरी यामुळे गर्दीने भरलेल्या शहरांमधील रस्त्यांवरून सुरळीतपणे प्रवास करण्यासाठी ही उत्तम आहे. आयवूमी ईव्हीच्या शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक मोटरसह भविष्यातील वाहतुकीचा स्वीकार करा, शुद्ध व पर्यावरणस्नेही राईड करा आणि हे सर्व करत असताना अतुलनीय आराम व सुविधा हे लाभ देखील मिळवा.


Back to top button
Don`t copy text!