
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । मुंबई । ठाणे शहरातील बंजारा समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आ. निलय नाईक, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर – जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदी उपस्थित होते. लखन आडे,विकास राठोड, वर्षा पाटील, छालुबाई जाधव, हिमांशु पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. श्री. बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले.
बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही श्री. बावनकुळे यांनी दिली.
