दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील रोहन महेश यादव याने भारतातील सर्वोत्तम आयआयटी पात्रता (IIT) प्रवेशासाठी देशपातळीवरील कठिण अशा JEE (ADVANCED) 2024 या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
रोहनचे प्राथमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा बारामती, माध्यमिक शिक्षण क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती व उच्च माध्यमिक शिक्षण आचार्य अकॅडमी, बारामती येथे झाले आहे. अभ्यासात सातत्य ठेवून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर रोहन यादव याने मिळवलेल्या यशाबद्दल गोखळी आणि परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
नामवंत आयआयटी महाविद्यालयात प्रवेश घेऊन इंजिनीअर होण्याचे स्वप्न असल्याचे रोहन यादव याने सांगितले आहे. या यशाबद्दल गोखळी आणि परिसरातून विविध क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे.