स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकरी रॅलीदरम्यान झालेल्या हिंसा प्रकरणात आतापर्यंत 22 जणांवर FIR

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 27, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २७: कृषि कायद्याच्या निषेधार्थ 26 जानेवारी रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारावर पोलिस अॅक्शनमध्ये आहेत. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर आतापर्यंत 22 FIR नोंदविण्यात आले आहेत. उपद्रव्यांची ओळख पटण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. लाल किल्ला आणि सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने आज पुन्हा लाल किल्ला मेट्रो स्टेशन बंद केले आहे. तर जामा मशीद मेट्रो स्टेशनचे एंट्री गेट देखील बंद केले आहेत.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी त्यांची ट्रॅक्टर परेड निश्चित वेळेपूर्वीच सुरु केली. पोलिसांनी परेडसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा वेळ आणि मार्ग ठरवून दिला होता. दिल्लीत प्रवेश करण्यासाठी सिंघू, टीकरी आणि गाझीपूर एन्ट्री पॉईंट्स बनविण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी सकाळी 8.30 वाजताच या एंट्री पॉइंट्सवर बॅरिकेड्स तोडून जबरदस्तीने दिल्लीत घुसले आणि आपली परेड सुरू केली. दरम्यान दिवसभर चाललेल्या या हिंसाचारात 300 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

दिल्ली मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. शहा यांनी अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्यांना राजधानीकडे पाठविण्याचे आदेश दिले. या उपद्रव्यांसोबत कठोर व्यवहार करण्याचे दिल्ली पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 7 FIR दाखल केले आहेत. दुसरीकडे दिल्लीतील हिंसेनंतर हरियाणात मंत्रिमंडळाची आपत्कालिन बैठक बोलवण्यात आली होती. मुख्यमंत्री खट्टर यांनी पोलिसांनी हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले. सोबतच दिल्लीजवळील सोनीपत. पलवल आणि झज्जार या तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि SMS सेवा बंद करण्यात आली आहे.

जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या भिंतीवरुन उड्या

दिल्लीमध्ये मंगळवारी ट्रॅक्टर परेडदरम्यान ठरलेल्या रस्त्यावरुन जाण्याऐवजी शेतकरी दुसऱ्या मार्गाने लाल किल्यावर दाखल झाले. हे शेतकरी सिंघु बॉर्डरवर दाखल झाले. यावेळी हिंसक आंदोलकांनी येथील जवान आणि पोलिसांवर हल्ला चढवला. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी जवान आणि पोलिसांनी भिंतीवरुन उड्या घेतल्या. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

इंटरनेट सेवा 12 वाजेपर्यंत बंद

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात चांगलाच गदारोळ झाला. शेतकऱ्यांना दिल्लीतून पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. यानंतर शेतकऱ्यांनी उपद्रव आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. वाढता तणाव पाहून अफवा पसरू नये यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा तात्पूर्ती बंद करण्यात आली आहे. दरम्यान शेकडो आंदोलनकर्ते अद्यापही लाल किल्ला परिसरात उपस्थित आहेत. दुसरीकडे हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहता गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकाऱ्यंकडून याबाबत रिपोर्ट मागवली आहे.

अपडेट्स…

सरकारने सिंघू, टिकरी, गाझीपूर सीमा तसेच मुकरबा चौक आणि नांगलोई भागातही इंटरनेट बंद केले आहे. या भागातच शेतकरी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे दिल्ली मेट्रोने ITO, दिलशान गार्डन, झिलमिल, मानसरोवर पार्क आणि जामा मशीद स्टेशन बंद केले आहेत.

संयुक्त किसान मोर्चाने म्हटले की, ‘आमच्या प्रयत्नांना न जुमानता काही संघटनांनी आणि लोकांनी निश्चित मार्ग तोडला आणि चुकीच्या कामात सामील झाले. आंदोलन शांततेत सुरू होते, पण काही समाजकंटक या आंदोलन घुसले. आम्ही नेहमीच शांतता कायम ठेवली आहे, जी आमची सर्वात मोठी ताकद होती आणि याचे उल्लंघन केल्याने आंदोलन कमकुवत होऊ शकते.’

याआधी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर दाखल झाले आणि खालसा पंथ आणि किसान संघटनांचा झेंडा फडकवला. जेथे तिरंगा कायम तिरंगा असतो तेथेही निदर्शकांनी त्यांचे झेंडे लावले. दरम्यान त्यांनी तिरंग्याला हटवले नाही.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर एका आंदोलकाने लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवल्या जाणाऱ्या ठिकाणी खासला झेंडा लावला.
दिल्लीत दाखल झाल्यानंतर एका आंदोलकाने लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवल्या जाणाऱ्या ठिकाणी खासला झेंडा लावला.

दुसरीकडे ITO जवळ पोलिसांसोबतच्या झडपेत वेगात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटल्याने मृत्यू झाला आहे. नवनीत सिंग असे या मृताचे नाव होते. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.

दिल्ली आयटीओजवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूचे वृत्त आहे. पोलिसांनानुसार, ट्रॅक्टर पलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
दिल्ली आयटीओजवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूचे वृत्त आहे. पोलिसांनानुसार, ट्रॅक्टर पलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

लाठीचार्ज, दगडफेकीत अनेक शेतकरी व पोलिस जखमी झाले

ITO पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असता शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या झडपमध्ये अनेक शेतकरी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर वेगाने चालवले असता पोलिसांना मागे हटावे लागले. पोलिसांनी तेथून पळ काढत जवळच्या इमारतींमध्ये गेले आणि तेथून शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केला.

नोएडाच्या पांडवनगरमध्ये शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्यांची तोडफोड देखील केली. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.
नोएडाच्या पांडवनगरमध्ये शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्यांची तोडफोड देखील केली. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.

निहंग्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला – पोलिसांचा दावा

याआधी गाझीपूर सीमेवरून निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा रोडवर अडवले आणि अश्रुधुराचा मारा केला. शेतकऱ्यांनी देखील पोलिसांवर दडफेक केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान शेतकऱ्यांनी पांडवनगर पोलिस पिकेटवर ट्रॅक्टर चढवल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच निहंग्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

अक्षरधामजवळ बॅरिकेड पार करताना आंदोलक, यावेळी अनेक निहंग देखील तलवारीसोबत फिरताना दिसले.
अक्षरधामजवळ बॅरिकेड पार करताना आंदोलक, यावेळी अनेक निहंग देखील तलवारीसोबत फिरताना दिसले.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या नांगलोईमध्ये पोलिसांचे जवान रस्त्यावर बसले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी देखील आहेत.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या नांगलोईमध्ये पोलिसांचे जवान रस्त्यावर बसले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी देखील आहेत.
दिल्लीच्या नांगलोईजवळ शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जे बॅरिकेड्स लावले होते, शेतकऱ्यांनी ते देखील तोडले.
दिल्लीच्या नांगलोईजवळ शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जे बॅरिकेड्स लावले होते, शेतकऱ्यांनी ते देखील तोडले.
पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून शेतकऱ्यांचा एक ताफा दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचला.
पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून शेतकऱ्यांचा एक ताफा दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचला.
गाझीपूर सीमेजवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे टाकले, मात्र शेतकरी थांबले नाही.
गाझीपूर सीमेजवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे टाकले, मात्र शेतकरी थांबले नाही.
दिल्लीच्या अक्षरधामजवळ रस्त्यावरील दुभाजक तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करताना आंदोलक शेतकरी
दिल्लीच्या अक्षरधामजवळ रस्त्यावरील दुभाजक तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करताना आंदोलक शेतकरी
दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये लोकांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. ही जागा सिंघू सीमेपासून जवळपास 14 किलोमीटर पुढे आहे.
दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये लोकांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. ही जागा सिंघू सीमेपासून जवळपास 14 किलोमीटर पुढे आहे.

पोलिसांनी दिलेला मार्ग शेतकर्‍यांनी अवलंबला नाही

पोलिस शेतकऱ्यांना म्हणाले होते की, प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर 12 वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढवा. मात्र शेतकऱ्यांना परेड संपण्याआधीच मोर्चा काढला. बॅरिकेड तोडून शेतकरी पुढे सरसावले आणि आता ते पोलिसांनी दिलेल्या मार्गावर देखील जात नाहीत. पोलिस देखील मागे हटली आहे.

मोर्चात एक लाख ट्रॅक्टर असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

पोलिसांनी शेतकऱ्यांना केवळ 5 हजार ट्रॅक्टरसोबत रॅली काढण्याची मंजुरी दिली आहे. मात्र एकट्या सिंघू बॉर्डवर 20 हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्टर दाखल झाले. याआधी सिंघू, टीकरी आणि गाझीपूरवर सुमारे 1 लाख ट्रॅक्टर जमा होणार असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला होता.


ADVERTISEMENT
Previous Post

​​​​​​​संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्या 70% पेक्षा जास्त लोकांना दुसरे आजारही होते; यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 55% लोक होते

Next Post

योग्य ब्रोकरच्या निवडीसाठी फिनॉलॉजीचा सिलेक्ट मंच

Next Post

योग्य ब्रोकरच्या निवडीसाठी फिनॉलॉजीचा सिलेक्ट मंच

ताज्या बातम्या

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021

मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या भावाविरोधातील बलात्काराचा गुन्हा लोणावळा पोलिस ठाण्यात वर्ग

March 2, 2021

अभिनेत्री शिवानी सुर्वे हीने ‘मराठी फिल्म फेअर’ सोहळ्यात पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) पुरस्कार

March 2, 2021

विना मास्क विरोधी पथक आणि माजी आमदारांत हाणामारी; गुलमंडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

March 2, 2021

हरियाणा सरकारचा मोठा निर्णय! भूमिपुत्रांना खासगी नोकरीत ७५ टक्के आरक्षण जाहीर

March 2, 2021

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 10 ऐवजी द्यावे लागणार 50 रुपये

March 2, 2021

2020 मध्ये मुकेश अंबानींच्या संपत्तीत 24%, तर अडानींच्या संपत्तीत दुपटीने वाढ

March 2, 2021

एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर ऍम्बुलन्स दान

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.