​​​​​​​संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्या 70% पेक्षा जास्त लोकांना दुसरे आजारही होते; यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 55% लोक होते


स्थैर्य,दि. २७: देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. याच काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा एक रिपोर्ट आहे, ज्यावरुन स्पष्ट होते की, कोरोनाने कोणत्या वयाच्या लोकांना सर्वात जास्त निशाणा बनवले. रिपोर्टनुसार, कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या 70% लोकांना संक्रमणासोबतच इतर आजारही होते. यामध्ये शुगर, हायपरटेंशन, हृदय आणि फुफ्फुसांसंबंधीत आजार असणारे सर्वात जास्त होते. वयानुसार बघितले तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या 55% लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. तर 45 ते 60 वर्षांच्या 33% रुग्णांनी जीव गमावला आहे.

कोणत्या वयाचे किती मृत्यू ?

वय मृत्यू
17 वर्षांपेक्षा कमी 1%
18-25 वर्षे 1%
26 ते 44 वर्षे 10%
45-60 वर्षे 33%
60 वर्षापेक्षा जास्त 55%

24 तासांमध्ये 12 हजार नवीन रुग्ण आढळले
मंगळवारी देशभरात 12 हजार 537 लोक कोरोना संक्रमित आढळले. 13 हजार 21 लोक रिकव्हर झाले आणि 127 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 90 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे यामध्ये 1 कोटी 3 लाख 58 हजारांपेक्षा जास्त लोक बरेही झाले आहेत. 1 लाख 53 हजार 751 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 73 हजार 731 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!