डॉ. राजेश देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी


 

स्थैर्य, पुणे, दि. १७ : पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाल्यानंतर गेले काही दिवस पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र, आता राज्य सरकारकडून पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या अगोदर त्यांनी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून पाहिले आहे.

सातारा सीईओ तसेच यवतमाळ येथे जिल्हाधिकारी असताना लोकाभिमुख कामगिरीमुळे डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांच्या मनात घर केले. यवतमाळ येथे शेतकर्‍यांना पीककर्ज न देणार्‍या राष्ट्रीयकृत बँकांना ताळ्यावर आणले. फवारणीतून विषबाधा झाल्याने शेतकरी, शेतमजुरासाठी किटची व्यवस्थाकेली. शेतकर्‍यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, मत्सशेती, धडक सिंचन विहीर, रेशीम शेती, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषीपंप वीजजोडणी, सर्वांसाठी घरे असे अनेक उपक्रम जिल्ह्यात राबवून एक अधिकारी अशी ओळख निर्माण करण्यापेक्षा ‘शेतकर्‍यांचा हिरो’ अशी बिरुदावली डॉ. राजेश देशमुख यांच्यानावापुढे आजही लावली जाते


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!