
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यामध्ये १४ जणांचा कोरोना बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्या मध्ये मारवाड पेठ येथील ६१ वर्षीय महिला, खाटीक गल्ली येथील १५ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय पुरुष, १३ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय महिला, ९ वर्षांची मुलगी, ४५ वर्षीय महिला, १९ वर्षीय महिला, मलठण येथील ४० वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील ४५ वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ५५ वर्षीय महिला, विडणी येथील २२ वर्षीय महिला यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८.३० वाजता दिली.
