
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
![]() |
| नागरिकांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप करताना श्री रंगशीळा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण दादा महानुभव |
स्थैर्य, फलटण दि.३ : पोगरवाडी, जि.सातारा येथील श्रीरंगशीळा देवस्थान ट्रस्टच्यावतीने नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.
कोरोना व्हायरस ने जगाला विळखा घातला असताना भारतातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे रंगशीळा देवस्थान ट्रस्टने पुढे येऊन जनजागृती म्हणून अत्यावश्यक मास्क, सॅनिटायजरचे मोफत वाटप केले आहे. कोरोनाबाबत जनजागृती व्हावी व नागरिकांचा बचाव व्हावा या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविला असल्याचे, या ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण दादा महानुभाव यांनी सांगितले.

