‘झी 24 तास’च्या ‘हितगुज’ सदरात डॉ.प्रसाद जोशी साधणार संवाद


 

स्थैर्य, फलटण दि.३ : येथील प्रसिद्ध अस्थिरोगशल्य चिकित्सक डॉ.प्रसाद जोशी ‘झी 24 तास’ या प्रसिद्ध टेलीव्हीजन वाहिनीवरील ‘हितगुज’ या सदरात ‘सांधेदुखी व त्यावरील उपचार’ या विषयावर संवाद साधणार आहेत. 

‘झी 24 तास’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण रविवार, दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात होणार असून सांधषदुखी म्हणजे काय?, त्याची लक्षणे काय आहेत?, ती कशी टाळावी?, सांधेरोपण शस्त्रक्रिया केव्हा आणि कशी करतात यावर डॉ.प्रसाद जोशी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!