
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
सातारा जिल्ह्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे (जीएसटी) नवे उपायुक्त म्हणून विजय देसाई यांनी पदभार स्वीकारला आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
स्थैर्य, सातारा, दि. १७ जुलै : सातारा जिल्ह्याचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाचे नवनियुक्त उपायुक्त विजय देसाई यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी असोसिएशनच्या कर समितीचे राज्य अध्यक्ष सागर शहा यांनी देसाई यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
विजय देसाई यांनी सातारा जिल्ह्यात जीएसटी विभागाच्या उपायुक्त पदाचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीबद्दल सागर शहा यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.