दिलीपसिंह भोसले यांचा वाढदिवस व महाराजा मल्टिस्टेट सोसायटीचा १३ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार मा. श्री. दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब यांचा वाढदिवस व महाराजा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा १३ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराजा मल्टिस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम रतदान सोहळ्याचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीच्या सभासदांना, सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना व सद्गुरू हरिबुवा महाराज सहकारी गृहतारण संस्थेच्या सभासदांना १० टके दराने लाभांश वाटप तसेच शाखांना बक्षीस वाटप व सेवकांना बोनस वाटप ८.३३ टके प्रमाणे मा. श्री. दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी मा. श्री. दिलीपसिंह भोसले यांनी आपल्या कुटुंबासहित श्री सद्गुरू हरिबाबांचे दर्शन घेतले, पत्नी सौ. मधुबाला भोसले, सौ. मृणालिनी व सौ. प्रियदर्शनी यांनी औक्षण केले.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्री. रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीराम बझारचे चेअरमन श्री. जितेंद्र पवार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री. रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता, रमेश आढाव, युवराज पवार, शती भोसले, श्री सद्गुरू व महाराजा संस्था समूहाचे सर्व संचालक व शाखा कार्यकारी समिती चेअरमन व समिती सदस्य, लायसन्स लबचे पदाधिकारी, मराठा मोर्चा समन्वय समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे पदाधिकारी, जैन सोशल ग्रुप फलटण, मोहीम योगा लब व महाराजा योगा लबचे सर्व सदस्य, दत्तनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे जाधव महाराज व पदाधिकारी, सद्गुरू उद्योग समूहाचे पदाधिकारी व कर्मचारी, महाराजा उद्योग समूहाचे पदाधिकारी व कर्मचारी, श्रीराम बझारचे संचालक व कर्मचारी, स्वयंसिध्दा महिला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दिलीपसिंह भोसले यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात कार्यरत असणार्‍या महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटण या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोसायटीचे चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी सोसायटीच्या कारभाराची माहिती दिली. सोसायटीची स्थापना ११ ऑगस्ट २०१० रोजी झाली असून दि. ३१ मार्च २०२३ अखेर सोसायटीच्या ठेवी ८९ कोटी ८५ लाख व सोसायटीची सभासदसंख्या ४००९ आहे. सोसायटीने ५९ कोटी ३३ लाख रूपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. सोसायटीची वार्षिक उलाढाल ८३६ कोटी ३३ लाख पोहोचली असून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सोसायटीला १ कोटी २ लाख रूपयांचा नफा झाला आहे. रतदान सोहळ्यामध्ये १०१ रतदाते सहभागी झाले, त्यांना सोसायटीमार्फत आकर्षक भेटवस्ू देण्यात आल्या.

याप्रसंगी स्वागत श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी केले. सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी प्रास्ताविक केले.
अनिल रूपनवर यांनी सूत्रसंचालन केले. महाराजा मल्टिस्टेटचे व्हा.चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!