माढा लोकसभेत आपलाच उमेदवार विजयी होणार; सुभाष शिंदेंची शरद पवारांना ग्वाही

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 19 ऑक्टोबर 2023 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात आपलाच उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील राहू; असा विश्वास जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, नंदकुमार मोरे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघांमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमधील फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारा मतदार हा आपल्याच बाजूने असून आगामी काळामध्ये योग्य सर्जिकल स्ट्राइक करून जर पंचायत समिती व जिल्हा परिषद गटनिहाय आखणी केली तर फलटण तालुक्यात सुद्धा नक्कीच सर्जिकल स्ट्राइक होईल असे मत व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!